डफरं by संजय वि. येरणे
Synopsis
‘डफरं’ या कथासंग्रहाने अख्ख्या महाराष्ट्रात संजय येरणे यांचे नाव साहित्यप्रांतात उच्चस्थानी पोहचविलेले आहे. किंबहुना त्यांच्या कथासंग्रहाला व अनेक साहित्य संग्रहालाही संस्थात्मक राज्यपुरस्कारही लाभलेले आहेत.
‘डफरं’ कथासंग्रहातील कथा वाचतांना एका वेगळ्याच जाणीवांची, संवेदनांची, मनाच्या भावनांची उकल करणारा, वैचारिक अधिष्ठान लाभलेला, तेवढ्याच चोवीस कॅरेटच्या सोन्याच्या शुद्धतेगत शतप्रतिशत प्रामाणिक इमान राखून समाजाला सत्य विचारांची मांडणी देणाऱ्या कथा आहेत. एकंदरीत संजय येरणे याचं ‘डफरं’ फारच वाजलं, गाजलं. त्याला एक विशेष कारणही आहे. आम्ही शेकडो कथा वाचल्यात पण ह्या कथाकाराची लेखनशैली, भाषा, संवाद, पात्र व समाजघडण नामनिराळी वाटली. आजपर्यंतच्या सामाजिक कथेचा ढाचाच बदलवून नव्या शैलीने प्रयोगात्मक कल्पकतेने पेश होणाऱ्या, पीएच.डी चा प्रबंधच साकारल्या जाईल एवढी सक्षम कथा.....
Reviews
Write your review
Wanna review this e-book? Please Sign in to start your review.